धाडसी खून बाबु गेल्या महिनाभरापासून महिपतीचा खुन कसा करायचा? याचा विचार करत होता. कारण त्याच्या बायकोने महिपतीमुळेच आत्महत्या केली आहे, हे त्याला चांगलच माहित होतं. आणी म्हणूनच त्यानं सगळं माहित असूनही महिपती सावकाराच्या शेतातलं काम अजूनही सोडलं नव्हतं. तो महिपतीचा काटा काढण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता. आठ महिण्यांपुर्वीच आपल्या नवविवाहीत बायकोला सखुला घेवून तो आपल्या गावाकडे काम नसल्यामुळे आणी शेती नसल्यामुळे हिरापूरला आला होता. हिरापुरात महिपती सावकाराच्या शेतात त्यानं साल धरलं होतं. गरीबी असली तरी पोटा पाण्याचा प्रश्न मिटला होता. त्यामुळे दोघेही नवरा-बायको सुखात होते. दोघेही शेतात दिवसभर काबाडकष्ट करत होते. त्यांच्या मेहनतीला फळ आलं होतं. साऱ्या