ह्या महिन्यात मितालीची किटी असल्याने आम्ही सगळेजण तिच्याकडे जमणार होतो. तिने साऊथइंडियन थिम ठेवली होती. आम्ही सगळ्याजणी अश्या तयार झालो होतो कि साऊथइंडियनच दिसत होतो. मितालीने घरपण छान सजवले होते. गेल्यागेल्या सगळ्याजणी एकमेकांचे कौतुक करत होत्या. त्यात प्रत्येकीने कुठून कसे सामान विकत आणले किंवा कोणाकडून घेतले, कोणाची कुठल्या प्रकारची साडी आहे, कोणी डोळ्यात जास्त काजळ घातले आहे, कोणाचा गजरा कुठल्या फुलांचा आहे ह्या सगळ्याबद्दल खाता खाता चर्चा सुरु होती. गप्पांची मैफील एकदम रंगात आली होती. नेहमीप्रमाणे एकदम कोणीतरी रजनीचा विषय काढलाच.सगळ्याजणी तिच्याविषयी वाईटच बोलत होत्या. मी आत्ताच इथे राहायला आल्यामुळे कोणाबद्दल फारशी माहिती नव्हती आणि दुसर्यांबद्दल मागे वाईट बोललेले मला