समीराला काय सांगावे ते शौर्यला सुचत नव्हतं.. किती विचार करतोयस??? समीरा शौर्यचा हात पकडतच बोलते.. शौर्य : "आपण कुठे तरी फिरायला जाऊयात..? फक्त दोघेच??" समीरा : "हे विचारायला तु एवढा वेळ लावलास.. किती ते टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर.." शौर्य : "पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीला अस एकटीला फिरायला घेऊन जातोय मग टेन्शन तर येणारच ना.." समीरा : "हम्म ते तर आहे. मला आवडेल तुझ्यासोबत फिरायला जायला.. पण कुठे जायच??" शौर्य : "तु सांग ना.. मला दिल्लीच एवढं नाही माहीत ग.." समीरा : "मला तरी कुठे माहिती.. " दोघेही विचार करू लागतात.. समीरा : "आपण नेक्स्ट विकमध्ये जाऊयात..??" शौर्य : "का?? ह्या विकमध्ये