झंगाट ‘जय हनुमान’ तालमीतील पोरं रोज पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम झाल्यानंतर परत पोहायला जायचे. आणी पोहल्यानंतर सकस खुराक घ्यायचे.तालमीतल्या पोरांचे शरीर बजरंग बली सारखे दणकट आणी पिळदार झाले होते. कामचुकार, काडी पहिलवान पिंटयाला त्याच्या बानं नविनच तालमीत लावलं होतं. रोज उठून व्यायाम करायचा आणी कुस्तीचा सराव करायचा त्याच्या जीवावर येत होतं. रोजच्या प्रमाणे पोरं आज पण व्यायाम करुन बंडु पाटलाच्या विहीरीवर पोहायला गेले होते. सगळयांनी विहीरीमध्ये उडया मारल्या होत्या. पाणी गार असल्यामुळं उडी मारावी का नाही, या विचारातच पिंटया होता. तितक्यात त्याला एक सुंदर मुलगी खांद्यावर सॅक लटकवून विहीरीजवळच्या पायवाटेने येताना दिसली. कोवळया उन्हात तिचा सुंदर