हाडळपीडा

  • 13.6k
  • 3
  • 4.3k

हाडळपीडा अमावस्याची रात्र होती. सगळीकडे काळयाकुट्ट अंधाराचे साम्राज्य पसरले होते. साडे दहा वाजताच सामसुम झाली होती. लाईट पण गेलेली होती. बबन आज बाहेरच ढाळजात झोपलेला होता. घरातले सगळेजण आतील खोल्यांमध्ये झोपले होते. बबनच्या काळजात धाकधूक होत होतं. आभाळ आल्यामुळं आणी डोंगरातलं गाव असल्यामुळं मोबाईलला रेंजच नव्हती. बबनचं आणी ताराचं तर आज कसल्याही हालतीत पळून जायचंच असं ठरलं होतं. कारण तिच्या घरामध्ये तिच्या लग्नाविषयी चर्चा सुरु झाली होती. मोबाईलला रेंज नसल्यामुळं तारा ठरलेल्या वेळेवर बाहेर येईल का ? याबाबत त्याच्या मनात काळजी लागून राहीली होती. एक महिन्यांपुर्वीच त्यांचं प्रेम जुळलं होतं. पाणीदार डोळे, काळेभोर,मुलायम केस, गोरा वर्ण, रेखीव शरीर,