अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 42

(18)
  • 10.1k
  • 4.5k

विराज रॉबिन नक्की कश्याला आलाय हे बघायला रूमबाहेर पडला.. शौर्य आणि ज्योसलीन सुद्धा त्याच्या मागून रूम बाहेर पडले.. "तो तुझा चरसी कश्याला आलाय इथे??",शौर्य फक्त ज्योसलीनला ऐकु जाईल एवढं हळु बोलतो " शौर्य स्टॉप टु कॉल हिम चरसी..",ज्योसलीन थोडं राग दाखवतच शौर्यला बोलली शौर्य : "बर बाबा नाही बोलत पण का आलाय तो इथे??" ज्योसलीन : "तु स्वतः चल आणि बघ.." "तुम्ही दोघ बहुतेक माझं दिल्लीला जाण केन्सल करणार वाटत.. हे देवा प्लिज वाचव..",शौर्य दोन्ही हात जोडत, मनात देवाच्या धावा करतो ज्योसलीन : "तु अस वेड्यासारख का वागतोयस आज??" शौर्य : "आता तुम्ही दोघांनी मिळुन मला सस्पेन्स मुव्ही दाखवायचं ठरवलय