प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १६.

  • 6k
  • 2.6k

रूम आत येऊन त्या व्यक्तीने आजीला आत बेडवर बसवले आणि आतून दार लावून घेतला....... नंतर आजीसमोर येऊन ती व्यक्ती उभी झाली...... आजी एकदम रागात त्या व्यक्तीवर धावून, चेहऱ्यावरचे मास्क ओढायचा पूर्ण ताकतीने प्रयत्न करते..... पण, ती व्यक्ती विरोध करते..... आणि काही वेळ अशीच ओढाताण करण्यात निघून जाते..... आजी : "कोण, आहेस कोण तू...... आणि या घरात घुसण्याची हिम्मत झालीच कशी तुझी...... थांब आताच मी पोलिसांना फोन करून, तुला त्यांच्या ताब्यात देते.... तेव्हाच तुझं डोकं ठिकाणावर येईल......??" आजी फोनकडे जाणार तोच त्यांच्या कानावर आवाज ऐकू येतो....... @@@ : "लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा चेहऱ्यावरचा तोच तिखटपणा बघून वाटतं की, बस..... आपली चॉइस