केनिया मारासफरी

  • 4.5k
  • 3
  • 1.5k

दोन वर्षांपूर्वी मावसजाऊ केनिया फिरायला आली होती, तेव्हा पहिल्यांदा केनिया सफारी केली. खूप सारे प्राणी, पक्षी, तानझानिया-केनिया बॉर्डर, आणि सगळ्यात जास्त पर्यटक जुलै-ऑगस्ट ह्या महिन्यात ज्यासाठी येतात ते वाईल्ड बीस्टचे रिव्हर क्रॉसिंग पण खूप छान बघायला मिळाले. वाईल्ड बीस्ट हे तानझानियाहुन अन्नाच्या शोधार्थ केनियाला येतात. इथे खाऊन पिऊन खुश होतात, समागम करतात आणि नंतर ते परत तानझानियाला जाऊन पिलांना जन्म देतात आणि ठरलेल्या वेळी परत पिलांना घेऊन केनियाला येतात. केनियाच्या मारा ह्या जंगलामध्ये एक नदी आहे, नदी साधारण १०-२० फूट खाली आहे. हे बीस्ट त्यांच्याबरोबर काही झेब्रे व कॉब हेपण अन्नाच्या शोधार्थ ही नदी पार करतात. सगळेजण एकदम शिस्तीत एका