स्वप्नद्वार - 2

  • 10.2k
  • 1
  • 5.3k

स्वप्नद्वार ( भाग 2 ) ही कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे. भाग 1 वरून पुढे. सूर्य माथ्यावर चढला होता. रात्रभर निशांतची झोप न झाल्यामुळे त्याचे डोळे चुरचुरत होते. आईच्या आवाजाने अर्धझोपेत असलेला निशांत अंथरुणावर जागा होऊन बसला होता. संपूर्ण शरीर एका वेदनेन जखडल्यासारख वाटत होत. गरम पाण्याचा शॉवर घेऊन त्याने त्या जखडलेल्या शरीराला स्फूर्ती दिली. थोड्याच वेळात स्वतःला टापटीप करून तो त्याच्या लहानपणीच्या मित्राला अर्थातच योगेशला भेटायला फॉरनो कॅफेत निघाला. मागच्या काही महिन्यापासून वाईट स्वप्नामुळे त्रस्त झालेल्या निशांतने आज सर्व कामाला विराम दिला होता आणि स्वतःसाठी काही वेळ आज काढला होता.