प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३३.

  • 6.4k
  • 2.7k

सकाळी..... हॉस्पिटलमध्ये सचिन पोहचतो..... आत जॉलीची ट्रीटमेंट सुरू असते....... आजी आणि आजोबा बाहेर बसून, डॉक्टरांची बाहेर येण्याची वाट बघत असतात..... सचिन : "आई - बाबा..... आली का जॉली शुद्धीवर....?" आजी : "नाही बाळा...... अजुन तरी नाही..... आणि हे काय...? तू जागलास रात्रभर...." तो नजर चोरत......? आजी : "सचिन..... काय विचारतेय मी......?" सचिन : "ते......??" आजोबा : "राणी सरकार..... पोलिस डिपार्टमेंटचे ऑफिसर आहेत साहेब..... रात्री अपरात्री जागून त्यांना कामं करायची असतात..... असं काळजी करून कसं चालेल.... बेटा सचिन जे कोणी आरोपी असतील त्यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे.... गुन्हा न्यायालय सिद्ध करेलच पण, आपल्याला माहित आहे गुन्हेगार तेच आहेत....?" सचिन : "हो