सकारात्मक ऊर्जा

  • 5.6k
  • 1.7k

अजीतने पटकन गाडीला कीक मारली,आणी तो वेगाने अमरच्या खोलीकडे निघाला कारण दोन मिनीटांपुर्वीच अमरचा मेसेज आला होता. ‘मी आत्महत्या करत आहे.’अजीत आणी अमर खुप जवळचे मित्र होते. त्यामुळे अजीतला अमरची सगळी माहिती होती. अमरची आणी त्याची सहा महिन्यांपुर्वीच मैत्री झाली होती. अमर एका खेडेगावातून शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आला होता. त्याची घरची परिस्थीती खुपच हलाकीची होती. गावाकडे मोलमजुरी करुन त्याचे आई-वडील त्याला पैसे पाठवायचे. अमरही अभ्यासात खुपच हुशार होता. तो ही खुप मेहनत घेत होता. त्याची हुशारी आणी मेहनत पाहूनच अजीतने त्याच्या सोबत मैत्री केलेली होती. अजीत त्याला वेळोवेळी