सोबत

  • 6.6k
  • 1
  • 2.1k

सोबत शशीने रात्रीचे जेवण पावणे दहा वाजता उरकले.सिगारेट ओढण्यासाठी तो बसस्टँडजवळच्या पक्याच्या टपरीकडे आला.हिवाळा असल्यामुळे सगळीकडे सामसूमच होती. टपरीजवळ अनोळखी दोघेजण उभे होते,सिगारेट ओढून ते दोघेही निघून गेले. थोडया वेळात एक बस आली. रात्री बसस्टँड मध्ये प्रवासी नसल्यामुळे ड्रायव्हरने बस आतमध्ये न नेता बाहेरच थांबवली. त्या बस मधून एक युवती उतरली. शशी सिगारेट ओढता-ओढता तिच्याकडे पाहत होता. खांबावरील बल्बचा प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्या प्रकाशात तीचं सौंदर्य तो न्याहळत होता.तिचा आकृतीबंधही खुपच विलोभनीय होता. त्याने मोबाईलमध्ये पाहिले, सव्वा दहा वाजले होते. ती नक्कीच शेजारच्या कुठल्यातरी खेडेगावची असावी आणी कोणीतरी येण्याची वाट पाहत असावी, असा अंदाज त्याने मनाशीच