अस्तित्व

  • 7.8k
  • 1
  • 2.3k

सदाने वाडा साफसूफ केला, दिवाबत्ती केली.. थोडावेळ बसला.. समोरच्या बैठकीत नजर फिरवली.. दोन छोटी मुलं सारिपाट मांडून खेळत बसली होती.. त्यातला पाटलाचा मुलगा हरण्याच्या बेतात असताना चिडला.." मी नाही जा .. चिडी खेळतोस." तो डाव मोडत म्हणाला." मी कायले खेळू धाकले मालक.. तुम्हीच त चिडी खेळून ऱ्हायले." सदा रडकुंडीला येत म्हणाला." ये पोट्यानो.. कायले दंगा करुन ऱ्हायले, भायेर जाऊन दंगा घाला जा.. " पाटील म्हणाले.आता मात्र सारं कसं शांत शांत वाटतं होतं, सदा आठवणीतून बाहेर आला. मांडीवरच दार बंद केलं का नाही ते पहायला तो पायऱ्या चढून गेला.." सद्या.. ये ना