सुखाच्या शोधात

  • 9.1k
  • 2
  • 2.3k

सुखाच्या शोधात दुपारच्या वेळी विकी आज बाईकवर शहराच्या बाहेर निघाला होता. तो कुठे चाललाय? याचे त्याला भान नव्हते. तशी त्याने अमली पदार्थांची किंवा मदिरेची नशा केलेली नव्हती. पण त्याच्या मनामध्ये निराशेची नशा चढली होती.निराशेने त्याचं मन काळयाकुट्ट ढगांनी आकाश झाकोळून जावं अगदी तसंच झाकाळून गेलं होतं. एखाद्या बेभान,बेफाम वादळा सारखे विचार त्याच्या मनात घोंघावत होते. त्या विचारांच्या वादळात त्याचे मन खचून चालले होते.त्याचे मन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते.त्याच्या बाईकच्या वेगापेक्षाही त्याच्या मनातील विचारांचा वेग जास्त होता.गाडीला तरी ब्रेक लावता येतं पण कधी कधी मनातील विचार चक्राला ब्रेक लावणं अशक्य होवून जातं. त्याचंही तसंच झालं होतं. तो आता शहरापासून