मोरपंख - भाग 1मोरपंखऑफिसचा पहिला दिवस म्हणून निखिल बस स्टॉप वर सर्व काम आटपून नेहमी प्रमाणे कासव गतीने न येता थोडा लवकरच आला होता.हातात घडयाळ ढुंकून पाहिलं तर 8 वाजले होते..बस येण्यासाठी अजून पाच मिनिटे वेळ होता.नेहमीप्रमाणे शिरूर busstop गजबजलेला होता.आजू बाजूला एस.ट्याची ये जा चालू होती त्याच बरोबर गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.बोअर होऊ नये म्हणून उभ्या असलेल्या निखिल ने खिशातला मोबाइल काढला.नागमोडी बोट फिरवत कसा तो पॅटर्न उघडला देव जाणे.फेसबुक update चालत बसला.गालावर मात्र प्रचंड स्मितहास्य जणू हिरवागार पाउस नुकताच पडून गेलेल्या गारव्यात इंद्रधनू उमलाव अगदी हुबेहूब तसच होत काही.बालपणीची मैत्रीण शर्वरीचीच अकाउंट होत ते बहुदा..तिच्याशी तो रोज बोलायचा