वारी समर्पणाची

  • 7.7k
  • 1.9k

सारंग आशुतोषची वाट पहात बसला.. आशुतोषनेच त्याला तिथे बोलावले होते.." काय बोलायचंय.. महत्वाचं आहे म्हणे? कॉलेज मध्येही बोलू शकला असताच की? " सारंग धुसफूसला.वाट पाहून सारंग कंटाळला होता.. आशुतोष.. जो जुनिअर होता.. पण जास्तच क्लोज फ्रेंड बनला होता.. सारंगला प्रश्न पडायचा...." असं काय आहे आशुमध्ये की मी त्याच्याकडे ओढला जातो? मनात ठरवतो आता हयाचं अजिबात ऐकायचं नाही.. लहान असूनही हक्क गाजवतो.. आताचच पहा.. मला बोलावून स्वतःच आला नाही.. आता बस पुन्हा ऐकायचं नाही.. " सारंग मनात बोलत होता.दुरून येणारा आशुतोष दिसताच त्याचं मन आनंदाने भरुन गेलं..