चेहरा पुसत विहान आरशासमोर उभा होता.. कुठल्यातरी कोपऱ्यात दडलेलं मानसी नाव आज पुन्हा कानावर पडलं.. तिचं आरसपाणी सौंदर्य डोळ्यासमोर तरळून गेलं.. चाफेकळी नाक.. लालचटुक ओठ.. गोल चेहेरा.. चित्रपटात गेली असती तर.. जाहिरात क्षेत्रात.. गायन क्षेत्रात.. कुठेही असली असती तर नक्कीच टॉपवर राहिली असती..तिचा तो लाघवी स्वभाव.. गोडं आवाज.. सारं भुरळ पडणारं.. पण आपलं हृदय आधीच कुणी चोरलं होतं.." मला तुमच्या पायाजवळ जागा मिळाली तरी स्वतःला धन्य समजेन.. मला तुमच्याकडून काहीही नको." मानसी म्हणाली." तुझी जागा पायाजवळ नक्कीच नाही.. पण हृदयातही नाही.. " विहान म्हणाला." आपण मैत्री नक्कीच करु शकतो..