वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल... आई बाबांना गावाहून फोन आला ...बाबांचे काका जे गेल्या काही दिवसापासून आजारी होते ते देवाघरी गेले. त्या वेळी मी आर्ट्स च्या शेवटच्या वर्षाला होतो....माझी परिक्षा जवळ आली होती म्हणून आईबाबांनी मला घरीच ठेवण्याच ठरवलं... खरतर अश्या बातम्यांनी मी पार घाबरून जायचो ...पण मन घट्ट करून मी आइबाबान्चा निरोप घेतला ...आईने शेजारच्या काकूंना सांगून माझी जेवणाची सोय केली होती ....मी रात्री आठ वाजता क्लास वरून घरी आलो... काकूंकडे घरच्या किल्ल्या ठेवल्या होत्या...त्या मी घेतल्या...काकूंनी जेवणासाठी आग्रह केला...पण मी घरीच जेवेण भूक नाही...असा बहाणा करून...मी काकुंकडून डब्बा भरून घेतला...किल्ल्या फिरवत मी काकूंच्या घरातून बाहेर पडलो...मनातून भीती जेवढी वाटत होती...तेवढीच