जानू - 4

  • 12k
  • 5.6k

जानू वर्गात येते ..सखी तर तिची वाटच पाहत असते ..जानू दिसताच ती तिच्या कडे जाते आणि ..खूप खुशीत तिला सांगते ..की ..जानू ला जो प्रोजेक्ट हवा होता तो ब तुकडीतील अभय कडे आहे ...तोच अभय जो तिच्या शेजारी राहतो..हे ऐकुन जानू च्या जीवात जीव येतो . जानू :पण सखी तुला कोणी सांगितलं ग ? सखी : अग तो अप्रीचा भाऊ आहे ना त्याच्या वर्गात ..अप्रिन भावाला सांगितलं ..तर त्यानेच सांगितलं ..की ..अभय कडे आहे म्हणून..अप्रीन मला रात्री सांगितलं.. ग..म्हटलं चला बर झाल ..एकदाचा जानू चा प्रोजेक्ट तरी मिळाला. जानू:thank you.. ग सखी ... मला तर खूप टेनशन आल होत ..