सावर रे.... - 7

  • 8.7k
  • 1
  • 3.5k

सप्त सुरांची सुरमयी आरोळी देऊन पक्षांच्या किलबिलाटाने आणि सूर्याच्या किरणांचे चहू बाजूला तुषार फुलवत पहाटेने आपले डोळे थोडेसे किलकिले केले होते तोच एक आवाज आला, आई…... आई बिचारी आई सकाळी पांढरे फुटायचा आधीच उठते हो, तिने आवाज ऐकून आश्चर्याने पाठी पाहिले तर नितीन चक्क सहा वाजता सकाळी उठून तयार होऊन तिला हाक देत होता. त्याला प्रतिउत्तर न देताच ती क्षणभर तशीच त्याच्या कडे पहात राहिली. त्याने पुन्हा तिला आवाज दिला, अग आई अशी पाहतेस काय, प्लिज चहा दे ना पटकन, मला उशीर होतोय. त्याची आई त्याच्या जवळ येत म्हणाली अरे रोज तुला