सावर रे.... - 8

(11)
  • 7.9k
  • 3.4k

एखाद्या सिंहाच्या गर्जने सारखा भारदस्त आवाज पुन्हा गरजला, या बसा हितं. नितीन घाबरत पुढे सरकला आणि त्या भारदस्त आवाज असणाऱ्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. क्षणभरासाठी त्या कडक व्यक्तित्वाच्या डोळ्यात चमक आली पण आपला आवाजातील दरारा त्यानी तसाच कायम ठेवला आणि म्हणाले, राधिका पाणी घेऊन या पावण्यास्नी. पुढे त्यानी नितीन सोबत आलेल्या व्यक्तीकडे एक रागीट कटाक्ष टाकला तर ती व्यक्ती खाली मान घालून लगबगीने वाड्याच्या आत निघून गेली. घाईतच आतून एक महिला पाणी घेऊन आली आणि नितीनला दिलं. त्याने प्याला भर पाणी घटाघट पिउन घेतलं आणि तो जवळच्या