देवदूत

  • 10.2k
  • 3.8k

" आता आपले काही खरं नाही !...मला नाही वाटत आपण इथून वाचू !..." ईशा पुन्हा पुन्हा तेच बोलत होती. आता इंद्रजित चांगलाच वैतागला. " मॅडम , तुम्ही स्वतः तर घाबरलेल्याच आहे , पण तुम्ही दुसऱ्याला घाबरवू नका..काही होणार नाही..आर्मी चे जवान येतील..धीर धरा.." इंद्रजित सर्वांना धीर देत होता. इतर सर्व भीतीने घाबरून गेले होते. एक वयोवृद्ध आजीबाई सतत हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होती. दुसरी एक महिला साडीच्या पदराने डोळ्यातील पाणी पुसत कोणीतरी मदतीला येईल या आशेने समोरच्या पारदर्शक दरवाज्यातून बाहेर पाहत होती. ऑफिसची साफसफाई करणारे दामू काका शांतपणे ऑफिसच्या बॉसच्या केबिन समोर खुर्ची टाकून बाहेर एकटक नजरेने बघत होते. त्या