हो... आहे मी विधवा... वयाच्या चाळीशीतच माझ्या आयुष्यात हा शब्द आला..लग्नानंतर मी माझ्या कुटुंबासोबत इतरांसारखीच खुप खुश होती. मी माझा नवरा आणि माझ्या दोन मुली असा माझा परिवार होता. पण आम्हांला कधी कोणाच्या विचारांची गरज लागत नव्हती. आम्ही जे काही करु ते आम्हांला आवडायचं, कोणी काही बोलेल किंवा कोणाला आवडेल की नाही याचा विचार आपण करायच नाही असं नेहमी माझा नवरा अविनाश मला आणि मुलींना सांगायचा. त्याने मला कधीच कपड्यांवर बंधन घातले नाही की मुलींना मनासारखं करण्यापासुन थांबवलं नाही. आज अविनाश आमच्या आयुष्यातुन गेला.. त्याचा एक महिन्यापूर्वी कामावरुन घरी परतत असताना रात्री अपघात झाला आणि त्या अपघातात तो आमच्यापासुन दुर