श्रावणधारा - भाग १

  • 8.8k
  • 1
  • 4.3k

('हातात आल्याचा गरमागरम चहा...खिडकीबाहेर यथेच्छ भुरभुरणारा अल्लड पाऊस... आणि माझी ही, एकूण चार भागांची प्रेमकथा, 'श्रावणधारा' तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.') ’यार तिला बघून माझे फ्रेंड्स काय म्हणतील? अगदी टिपिकल...केवढी आऊटडेटेड आहे. शीट्टsss, शॉनला सांगत होतो एकटाच गाडी घेऊन ये. त्या निक्याला घेऊन येऊ नकोस, तर सोबत अजून पॅम. सो ऑकवर्ड. सगळ्यांसमोर हसे होणार? राघवच्या मनात एक ना हजार प्रश्न उभे होते. अखेर ईन्टरनॅशनल एअरपोर्ट सेकंड गेटने मीरा बाहेर पडली. आपली बॅग सावरत तिने दुरुनच हात दाखवला, इकडे पट्ठ्या पाच मिनिटे फुल टू कन्फ्युज.‘हिच का ती? काय वेडसर दिसत होती लग्नात… हिरवागार चमकीचा चापुन-चोपून नेसलेला शालू... ती आजी-पणजीच्या काळातली नाकापेक्षा जड