श्रावणधारा - भाग २

  • 6.7k
  • 3.3k

पुढे चालू...----------------------------------------------------------------------- "लंचसाठी बाहेर जाऊया? की काही ऑर्डर करु?" "मी लंचसाठी नसेन कदाचीत. ईन्स्टिट्युटला थोड काम आहे, वेळ आहेच तर तिथे जाऊन येईन म्हणते." "ओके... थॅक्स. तू हे सगळ घेऊन इथे आली त्यासाठी, आय मीन बाबांच्या भेट वस्तू आणि ते पेपर्स वगैरे..." "त्यांनी तसं बजावलच होत मला, स्वतः घेऊन जा म्हणून. तेव्हा मी म्हणाले होते, कुरिअर करते. बापरे! केवढे रागवले होते ते माझ्यावर. म्हणाले होते, 'अगं एवढ्या महत्वाच्या जपून ठेवलेल्या वस्तु आणि ते पेपर्स कुरिअर मध्ये गहाळ झाले तर? परत आणून देणार आहेस का! तू स्वतः जा आणि दे त्याला.' खर सांगायच तर, गारवानला माझ देखिल महत्वाच काम आहेच. दोन्ही