आईचे मुलाला पत्र..

  • 18k
  • 4.2k

प्रिय सोनु... खरंतर मी तुला सोनु बोलते ते ही कदाचित तुला आवडत नसेल.. पण असुदे.. तु कितीही मोठा झाला तरी माझ्यासाठी तु कायम सोनुच असणार आहेस. कसा आहेस तु??? प्रिया कशी आहे ?? आणि आपला कियु आता बोलायला लागला असेल ना तो??? माझी कितीही इच्छा झाली तरी आज मी त्याला बघु शकत नाही... मला माहीत नाही का?? पण आपल्या या घरात मला अजिबात करमत नाही, जिथे मी माझा संपुर्ण संसार आनंदात आणि हसत जगली, त्याच घरात आज मला श्वास घेता येत नाही. घुसमटल्या सारखं होतंय.. कदाचीत तुझी खुप सवय झाली असावी या घराला. तुला खरंच वाटत नाही का आईला भेटायला