दिवाना दिल खो गया (भाग ११)

  • 7.3k
  • 1
  • 3.1k

(त्याचे मन आता इथे लागत नव्हते कधी एकदा घरी जाऊन अम्मा – अप्पा आणि मुग्धाला भेटतोय असे झाले होते त्याला. आता पुढे..) पण त्याच्या ऑफिसच्या कॉंट्रॅक्ट प्रमाणे त्याला त्याचा येण्याजाण्याचा खर्च स्वत: करावा लागणार होता. कारण २ वर्ष पूर्ण व्हायला अजून एक वर्ष बाकी होते. पण सिलूला त्याची फिकीर नव्हती. त्याने १५ दिवसांच्या सुट्टीचा अर्ज टाकला आणि तो त्याच्या बॉसच्या रीप्लाय चा वेट करू लागला. ह्या एक वर्षात त्याच्या हुषारीमुळे बॉस त्याच्या कामावर खूप खुश होते. त्यांनी लगेच सिलूची सुट्टी अप्रूव केली. सिलूला बॉसचा मेल आलेला पाहून खूप आनंद झाला. आता मोठे टेंशन होते ते टीकेट्सच. इतक्या कमी वेळात सगळे