दिवाना दिल खो गया (भाग ११) preeti sawant dalvi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

दिवाना दिल खो गया (भाग ११)

(त्याचे मन आता इथे लागत नव्हते कधी एकदा घरी जाऊन अम्मा – अप्पा आणि मुग्धाला भेटतोय असे झाले होते त्याला. आता पुढे..)

पण त्याच्या ऑफिसच्या कॉंट्रॅक्ट प्रमाणे त्याला त्याचा येण्याजाण्याचा खर्च स्वत: करावा लागणार होता. कारण २ वर्ष पूर्ण व्हायला अजून एक वर्ष बाकी होते. पण सिलूला त्याची फिकीर नव्हती. त्याने १५ दिवसांच्या सुट्टीचा अर्ज टाकला आणि तो त्याच्या बॉसच्या रीप्लाय चा वेट करू लागला.

ह्या एक वर्षात त्याच्या हुषारीमुळे बॉस त्याच्या कामावर खूप खुश होते. त्यांनी लगेच सिलूची सुट्टी अप्रूव केली. सिलूला बॉसचा मेल आलेला पाहून खूप आनंद झाला. आता मोठे टेंशन होते ते टीकेट्सच. इतक्या कमी वेळात सगळे कसे मॅनेज होईल ह्याचे सिलूला थोडे टेंशन आले. त्याला सुट्टीचा एक दिवस पण फुकट घालायचा नव्हता.

तो प्रथम त्याचे सगळे काम पूर्ण करून आणि व्यवस्थित वेरिफाय करून कॅनडामधून निघाला. तो काही तासात त्याच्या अमेरिकेत असणाऱ्या घरी पोहोचला. त्याने जॉर्जला फोन करून तो इंडियाला जायला निघणार आहे असे सांगितले. जॉर्ज काही वेळातच सिलूच्या घरी पोहोचला. तेव्हा सिलूने इंडियामध्ये जे जे घडले ते सर्व जॉर्जला सांगितले. मग त्या दोघांनी काही ट्रॅवल ऐजंट्सना कॉल केला. पण तेवढ्यात सिलूला त्याच्या बॉस चा कॉल आला. त्याने सिलूच्या इंडियाला जाणाऱ्या आणि तिथून रिटर्न येणाऱ्या विमानप्रवासाच्या टिकीटाची व्यवस्था केली होती. त्यामुळे सिलू खूपच रीलॅक्स झाला. त्याला उद्याच निघायचे होते. त्याने त्याला लागणारे महत्वाचे सामान पॅक केले आणि तो झोपी गेला. खरतर सिलूला झोपच येत नव्हती. त्याला कधी एकदा घरी जातोय असे झालेले.

त्याच्या डोळ्यासमोर सारखा मुग्धाचा चेहरा येत होता. त्याने स्वप्नातच मुग्धाला घट्ट मिठी मारली आणि तिच्या ओठांवर कीस केले आणि त्याने कानात ईयरप्लग घातले आणि एक रॅनडम गाणे लावून तो ते ऐकू लागला. आज त्या गाण्याचे शब्द ऐकताना ते गाणे जसे काही तो मुग्धासाठी गात आहे असे त्याला वाटत होते.
♬कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में सभी के लिए
किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए
तेरा मिलना है उस रब का इशारा मानो
मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए
कुछ तो है तुझ से राबता ♬ कुछ तो है तुझ से राबता ♬
कैसे हम जाने, हमें क्या पता कुछ तो है तुझ से राबता♬
तू हमसफ़र है, फिर क्या फिकर है
जीने की वजह यही है मरना इसी के लिए ♬

सिलू सकाळी उठून फ्रेश झाला. त्याला एयरपोर्टवर सोडायला जॉर्ज आणि मीरा दोघेही आले होते. त्याने मुग्धाला मेसेज केला की, तो आज दिवसभर बीजी असणार आहे सो त्याला फोनवर बोलता येणार नाही. म्हणून आज जस त्याला वेळ मिळेल तसा तो मुग्धाशी मेसेजद्वारे बोलणार होता. मुग्धा थोडी खट्टू झाली. पण तिने स्वत:ला सावरले कारण तिचा रुसवा काढायला सिलू तिच्या जवळ थोडी होता. सिलूची कनेक्टिंग फ्लाइट होती. सिलू घरी जाण्यासाठी खूपच एक्ससाईट झाला होता. कधी हा विमान प्रवास संपतोय असे त्याला झाले होते. सिलूने साहीलला त्याच्या येण्याची खबर दिली होती. साहीलला त्याने फ्लाइट डिटेल्स पण सेंड केल्या होत्या.

इथे मुग्धा प्रॉमिस केल्याप्रमाणे रोज अम्मा-आप्पांना संध्याकाळी भेटायला येत होती. अम्मा तिला जेवल्याशिवाय पाठवतच नसे. अम्मा मुग्धाचे लाड करायला लागली होती. पण मुग्धाला सारखे मनात विचार येत असत की, जर अम्माला माझ्या आणि सिलूबद्दल कळले तर ह्याच प्रेमाचे रागात रूपांतर होईल आणि मग ती अम्मा – आप्पांना कायमची गमावून बसेल.
पण सध्या तरी ती अम्माच्या प्रेमाचा वर्षाव अनुभवत होती.

इथे सिलू तब्बल एक वर्षांनंतर भारतात परतला होता. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. रात्री १२.३० ला त्याची फ्लाइट भारतात पोहोचली. सिलूच्या सांगण्याप्रमाणे साहीलने एयरपोर्ट जवळ एका हॉटेलमध्ये रात्रीसाठी रूम बूक केली होती आणि तो पण रात्रभर सिलूबरोबर तिथेच राहणार होता. सिलू फ्रेश झाला आणि त्याने मुग्धाला मेसेज केला. मुग्धा थोडी सिलूवर रागावली होती त्यामुळे तिने मोबाइल चे इंटरनेट बंद ठेवले होते. तसेच फोन ही सायलेंटवर होता. सिलू सुद्धा प्रवासाने खूप थकला होता. साहील शी थोडे बोलून दोघेही झोपी गेले.

इथे अम्माने आज ब्रेकफास्टमध्ये इडली सांबर बनवले होते आणि तिने मुग्धाला लवकर घरी बोलविले होते. मुग्धा सकाळी सकाळी सिलूच्या घरी पोहोचली. अम्माने लगेच तिला इडली सांबार खायला दिले आणि आप्पांना उठवायला अम्मा बेडरूम मध्ये गेली. इतक्यात दारावरची बेल वाजली. मी बघते असे म्हणत मुग्धा दरवाजा उघडायला गेली.
दरवाजा उघडताच सिलूला समोर बघून मुग्धा फ्रीज झाली. तिला काय आणि कसे रीअॅक्ट व्हावे हेच काळात नव्हते.

सिलू ही मुग्धाला बघतच राहिला. एक क्षण त्याला वाटले की, मुग्धाला घट्ट मिठीत घ्यावे आणि वेळ तिथेच थांबावी. मुग्धाला ही असेच वाटत होते. ते दोघे मनोमनी विचार करत होते...
♬जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है
जान-ए-जां दिलों पे प्यार का
अजब सा असर हो रहा है ♬
गले से लगा लूं लबों पे सजा लूं
तेरे अफ़सानों को अपना बना लूं
दर्द है हल्का सा मगर हो रहा है
जान-ए-जां दिलों पे प्यार का
अजब सा असर हो रहा है
जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है♬

दोघेही भान विसरून एकमेकांत गुंतून गेले होते. इतक्यात अम्माचा आवाज आला. “मुग्धा कोण आलय ग?”
पण मुग्धाचे काहीच प्रत्युत्तर आले नाही. मग अम्मा स्वत: च बाहेर आली आणि समोर सिलूला पाहताच तिच्या आनंदाला पारावर उरला नाही.
“सिलू” अम्माने जोरात हाक मारली. तेवढयात सिलू भानावर आला आणि त्याने अम्माला गच्च मिठी मारली. तो अम्माला भेटून काही वेळात अगदी लहान मुलासारखा रडू लागला. सिलूला पाहून अम्माला ही रडू कोसळले. त्या दोघांना असे रडताना पाहून मुग्धाचे ही डोळे पाणावले. सिलूने स्वत:ला सावरले आणि तो आप्पांना भेटायला त्यांच्या खोलीत गेला. त्याच्या पाठोपाठ अम्मा ही आत गेली. आज जवळ जवळ एक वर्षांनंतर तो त्याच्या अम्मा-अप्पाला भेटत होता, बघत होता.

मुग्धा शांत उभी राहुन त्या तिघांचे प्रेम न्याहळत होती. इतक्यात अम्माचे लक्ष मुग्धाकडे गेले. अम्मा म्हणाली, “मुग्धा तू बोललीस पण नाही की, सिलू आज येणार आहे ते. तू त्याच्या कंपनीमध्ये काम करतेस ना. म्हणजे तुला नक्की माहीत होते हो ना?”
मुग्धा काही बोलणार तेवढ्यात अम्मा म्हणाली, “तुला नक्कीच सिलूने सांगितले असेल नको सांगू म्हणून. त्याला सरप्राइज द्यायचे होते न आम्हाला.” असे म्हणत अम्माने मायेने सिलूच्या डोक्यावरून हात फिरवला.

मुग्धा त्या दोघांकडे पाहून मंद हसली आणि अम्माला म्हणाली, “अम्मा मला ऑफिसला जायला उशीर होतोय मी निघते. तुम्ही तुमची आणि आप्पांची काळजी घ्या. मी रोज फोन करेन. आता सिलू आलाय सो मला काही चिंता नाही. येते मी.”

मुग्धा निघतच होती. तेवढ्यात अम्माने मुग्धाचा हात पकडला आणि तिला म्हणाली, “मुग्धा बेटा, सिलू आला म्हणून काय झाले. तू रोज येतेस तशीच येत जा. तू जर एक दिवस डोळ्यासमोर दिसली नाहीस ना तर आप्पांना बिलकुल करमत नाही. ते नेहमी म्हणतात जर आपल्याला मुलगी असती तर ती सेम मुग्धा सारखी हवी होती. खर तर बाळा मला ही नाही करमत ग. तू प्लीज येत जा.” असे म्हणून अम्माने मुग्धाच्या कपाळावर किस केले.

सिलूचा आनंद तर गगनात मावत नव्हता. त्याने हळूच मुग्धाला डोळा मारला. मुग्धाने डोळ्यानेच त्याला गप्प राहण्याचा इशारा केला.

मुग्धा निघताच सिलू अम्माला म्हणाला, “अम्मा माझ एक महत्वाचे काम आहे ऑफिस मध्ये. मी अर्ध्या-एक तासात येईन परत” असे म्हणून तो मुग्धा पाठोपाठ निघाला.


क्रमश:
सिलू आणि मुग्धाच्या प्रेमकथेत पुढे काय काय वळणे येतील हे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.)
@preetisawantdalvi