दिवाना दिल खो गया (भाग १२)

  • 7.1k
  • 3.1k

(मुग्धा निघताच सिलू अम्माला म्हणाला, “अम्मा माझ एक महत्वाचे काम आहे ऑफिस मध्ये. मी अर्ध्या-एक तासात येईन परत” असे म्हणून तो मुग्धा पाठोपाठ निघाला. आता पुढे..) सिलूने मुग्धाला फोन केला. ती गेट बाहेरच उभी होती. तिला माहीत होते सिलू तिला भेटल्याशिवाय ऑफिसला जाऊच देणार नाही. म्हणून तिने लंच टाइम पर्यंत ऑफिसला येईन असे ऑफिसमध्ये आधीच कळविले होते. सिलूने लगेच साहीलला फोन केला. सिलूला माहीत होते की, साहील घरी एकटाच आहे. म्हणून सिलू मुग्धाला घेऊन तिथेच गेला. त्या दोघांना आलेले बघून साहील काहीतरी कारण सांगून बाहेर निघून गेला. आता साहीलच्या घरात सिलू आणि मुग्धा दोघेच होते. दोघे इतक्या दिवसांनंतर एकमेकांना भेटत