Diwana Dil Kho Gaya Part-12 books and stories free download online pdf in Marathi

दिवाना दिल खो गया (भाग १२)

(मुग्धा निघताच सिलू अम्माला म्हणाला, “अम्मा माझ एक महत्वाचे काम आहे ऑफिस मध्ये. मी अर्ध्या-एक तासात येईन परत” असे म्हणून तो मुग्धा पाठोपाठ निघाला. आता पुढे..)

सिलूने मुग्धाला फोन केला. ती गेट बाहेरच उभी होती. तिला माहीत होते सिलू तिला भेटल्याशिवाय ऑफिसला जाऊच देणार नाही. म्हणून तिने लंच टाइम पर्यंत ऑफिसला येईन असे ऑफिसमध्ये आधीच कळविले होते.

सिलूने लगेच साहीलला फोन केला. सिलूला माहीत होते की, साहील घरी एकटाच आहे. म्हणून सिलू मुग्धाला घेऊन तिथेच गेला. त्या दोघांना आलेले बघून साहील काहीतरी कारण सांगून बाहेर निघून गेला. आता साहीलच्या घरात सिलू आणि मुग्धा दोघेच होते.

दोघे इतक्या दिवसांनंतर एकमेकांना भेटत होते. सिलूने मुग्धाचा हात घट्ट पकडून ठेवला होता. काय बोलावे हेच त्या दोघांना कळत नव्हते.
सिलू एकसारखा घरभर नजर फिरवत होता. मुग्धाने मनात विचार केला. याच्याने काही नाही होणार. मलाच काहीतरी करावे लागेल.

इतक्यात सिलू काही बोलणारच होता की, तेवढ्यात मुग्धाने सिलूच्या ओठांवर ओठ टेकविले आणि मग सिलू ही तिला प्रतिसाद देत तिला कीस करू लागला. दोघेही एकमेकांत पूर्णपणे हरवून गेले होते. त्यांना कोणाचीही फिकर नव्हती.

काही क्षणांत दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. सिलू मुग्धावर प्रेमाचा वर्षाव करीत होता. मुग्धाला आता स्वत:वर ताबा ठेवणे अशक्य होत होते. पण सिलू त्याची मर्यादा ओळखून होता. तो हळूहळू मुग्धापासून दूर झाला.

मुग्धाने सिलूचा शर्ट घट्ट पकडला होता. तिने सिलूकडे पहिले. पण सिलूने मुग्धाचा शर्ट वरचा हात काढून हातात घेतला आणि तिच्या कपाळावर कीस केला.
मुग्धाला क्षणभर ओशाळल्यासारखे झाले. तिला कळतच नव्हते की थोड्या वेळापूर्वी तिला काय झाले होते. ती मनात विचार करू लागली. जर थोड्यावेळापूर्वी सिलू थांबला नसता तर.. मुग्धाने लाजून दुसरीकडे बघितले. पण सिलू फक्त मुग्धाला पाहत होता आणि तेव्हा त्याला त्याने ऐकलेल्या एका गाण्याची आठवण झाली.
♬मिला हूँ अब जो तुम से है
दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला..
तुझे है पाया रब से है
दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला..
हर पल हसीं सा हुआ है
साँसों को तूने छुआ है
बढ़ी तुझसे नज़दीकियाँ सुकून मिला, सुकून मिला..♬

सिलू मनातल्या मनात हसला आणि मुग्धाला म्हणाला, “आय लव यू सो मच मुग्धा”.
मुग्धाने ही त्याला “आय लव यू टू” असे उत्तर दिले.

थोड्यावेळाने मुग्धा लटक्या रागात सिलूला म्हणाली, “सिलू तू अचानक कसा आलास आणि मला सांगितल देखील नाही. मी अचानक तुला समोर पाहून क्षणभर विरघळूनच गेले. मला भानच नव्हते की, मी नक्की कुठे आहे ते. जर अम्माला आपल्याबद्दल कळले असते तर?”

“कळले असते तर कळले असते, इतके काय टेंशन घेतेस. तसे पण आता मी खरंच अम्मा अप्पा आणि तुझ्याशिवाय नाही राहू शकत मुग्धा!!
मला अजून एक वर्ष तिथे एकटा राहायची कल्पना पण सहन होत नाहीये. म्हणून मी ठरवलय की, तुला आणि अम्मा अप्पा तिघांनाही अमेरिकेला घेऊन जायचे. तसेही माझे अपार्टमेंट खूप मोठे आहे. आपण चौघे खूप आनंदात राहू तिथे.” असे म्हणून सिलूने मुग्धाला जवळ ओढले आणि तिच्या कपाळावर किस केले.

“पण सिलू अम्मा मला अॅक्सेप्ट करेल का? म्हणजे तिला तर तुमच्या कास्ट मधली मुलगी हवी होती ना सून म्हणून.” मुग्धा म्हणाली.

“ते सर्व तू माझ्यावर सोड. मी आजच अम्माशी आपल्याबद्दल बोलतो. मगच तू तुझ्या घरी सांग. ओके. चल आता निघूया. तू फ्रेश हो तोपर्यन्त मी साहीलला फोन करून सांगतो की, आपण निघतोय म्हणून”, सिलू म्हणाला.

थोड्यावेळाने सिलूने मुग्धाला तिच्या ऑफिसजवळ सोडले आणि तो त्याच्या घरी निघून गेला.

घरी येताच त्याला जेवणाचा खमंग सुगंध आला. तो तडक किचनमध्ये गेला. तर आज अम्माने खास त्याच्या आवडीचा बेत केला होता. अम्माने आज जेवायला साहीलला सुद्धा बोलविले होते. पण काही महत्वाच्या कामामुळे त्याला येणे शक्य नव्हते.

काही वेळानंतर जेवणे आटोपली. आज कित्येक दिवसानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. अम्मा आज खूप खुश होती. सिलूने ह्याचाच फायदा घेत मुग्धाबद्दल अम्माशी बोलायचे ठरविले.

तो अम्मा-अप्पा ना समोर बसवत म्हणाला, “अम्मा-अप्पा मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे.”

“बोल ना सिलू”, अम्मा म्हणाली.

“अम्मा-अप्पा पहिले आय एम वेरी सॉरी. मी त्यादिवशी तुमच्या सोबत नव्हतो. मला कंपनीने एक महत्वाच्या प्रोजेक्ट साठी कॅनडाला पाठविले होते. त्यामुळे काही दिवस मला फोन बघण्याइतकी पण फुरसत नव्हती. पण जेव्हा मला कळले तेव्हा तडक मी इथे निघून आलो. अम्मा मी तुमच्या दोघांशिवाय नाही राहू शकत. नशीब त्यादिवशी मुग्धा वेळेवर आली नाहीतर..” असे बोलून सिलूचा आवाज जड झाला. त्याला रडुच कोसळले.

तो पुढे म्हणाला, “म्हणून मी ठरवलय की, तुम्हा दोघांना माझ्याबरोबर अमेरिकेला घेऊन जायचे. मग पुढचे पुढे बघू. मी उद्याच जाऊन डॉक्टर सहाणे यांना भेटतो आणि मग आपण पुढचे ठरवू.” इतके बोलून तो क्षणभर थांबला.

तेवढ्यात अम्मा म्हणाली, “पण एकदम अचानक आम्ही इथले सगळे सोडून कसे येऊ तुझ्याबरोबर. मला तुझी काळजी कळतेय सिलू. पण असे अचानक मला नाही येता येणार.”

“सिलू, तू उगाच टेंशन घेऊ नकोस. आपण यावर काहीतरी मार्ग काढू. सध्यातरी तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर” असे अप्पा म्हणाले.

“पण आता तुम्हाला इथे एकटे सोडून माझे तिथे कामावर मन लागणार नाही. एकसारखी तुमची काळजी वाटत राहील. त्यापेक्षा आपण एकत्र राहू.”सिलू म्हणाला.
“ठीक आहे सिलू बेटा. मी विचार करून सांगतो तुला.” असे म्हणून अप्पा खोलीत जायला उठतच होते की, सिलू म्हणाला,
“अम्मा-अप्पा ते मला अजून पण तुम्हाला काही सांगायचे होते. पण कसे सांगू ते समजत नाहीये”

“काय झाले सिलू, तुला काही कामाचे टेंशन आहे का?”, अम्मा म्हणाली.

“नाही ग अम्मा. ते अॅक्चुली.. ते मला.. ते मुग्धा.. मी..”, सिलूला कसे सांगावे तेच कळत नव्हते. तो एक मिनिट बोलून वॉशरूम मध्ये गेला. त्याने सपकन तोंडावर पाणी मारले व स्वत:शीच म्हणाला, ‘कमॉन सिलू यू कॅन डू ईट. हीच वेळ आहे मुग्धाबद्दल बोलायची’
असे बोलून त्याने किचनमध्ये जाऊन पहिले घटाघटा पाणी प्याले आणि तो पुन्हा अम्मा-अप्पा जवळ येऊन बसला.

सिलूचे आजचे वागणे पाहून अम्माला ही कळत नव्हते नक्की सिलूला काय झालय ते.

“सॉरी. असे बोलून सिलू पुढे बोलू लागला, “अम्मा-अप्पा..... मला मुग्धाबरोबर लग्न करायचे आहे. मी आणि मुग्धा एकमेकांना गेल्या एक-दीड वर्षापासून ओळखतो. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. मला इतक्यात तरी तुम्हाला हे सर्व सांगायचे नव्हते. पण आता मला हीच वेळ योग्य वाटली. मी मुग्धाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार माझी पत्नी म्हणून नाही करू शकत. पण जोपर्यंत तुम्ही दोघे तयार होत नाही तोपर्यन्त तरी मुग्धाच्या घरी नाही सांगायचे हे आमचे ठरले आहे.”

सिलूने सर्व एकादमात सांगून टाकले व तो अम्माच्या रीअॅक्शनची वाट पाहू लागला.

अम्माने एकवार अप्पांकडे पाहिले आणि तिला हसू आले. सिलूला अम्माचे वागणे कळतच नव्हते.

अम्मा म्हणाली, “अरे वेड्या, तुला काय वाटले मला काहीच माहीत नाही. जेव्हा साहीलने मला फोन करून सांगितले की, मुग्धा येईल डॉक्टरांना घेऊन तेव्हा मला ती तुझ्या ऑफिस मधली सहकारीच वाटली. पण ती दोन दिवस आमच्याबरोबर होती. अगदी आमच्या मुलीसारखी आमची काळजी घेतली तिने. एकेदिवशी ती आंघोळीला गेली असताना तिचा फोन वाजला आणि मी फोनच्या स्क्रीनवर तुझा आणि तिचा फोटो बघितला. तेव्हा मला थोडा डाऊट आला. म्हणून मी जाणूनबूझुण तुझे नाव सारखी तिच्यासमोर घ्यायची. तेव्हा ती बिचारी कावरीबावरी व्हायची.
एकदिवस साहील आप्पांना भेटायला घरी आला. तेवढ्यातच मुग्धा घरी जायला निघाली होती. ती गेल्यावर मी त्याला तुमच्याबद्दल विचारले. आधी तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. नंतर त्याला थोडा दम दिल्यानंतर त्याने मला सगळे सांगितले. मला सगळे माहीत आहे हे तो तुला सांगू नये म्हणून मी त्याला स्वत:ची शपथ घातली”

सिलू मनातल्या मनात साहीलला शिव्या घालत होता.

अम्मा पुढे म्हणाली, “सिलू मला नेहमी वाटायचे की आपल्या कास्ट मधली मुलगी या घरात सून म्हणून आणावी. पण मुग्धाला भेटल्यावर आणि तिच्याबरोबर कठीण परिस्थित वेळ घालवल्यावर मला कळले की, कास्ट वगैरे काही महत्वाचे नसते. आपण माणूस म्हणून कसे आहोत हे महत्वाचे असते. तू मला मुग्धाबद्दल आधी सांगितले असतेस तर मी नक्कीच नाही म्हटले असते. पण आता मला मुग्धाशिवाय ह्या घरात सून म्हणून दुसरे कोणीच नको. तू इथे असेपर्यंत आपण मुग्धाच्या घरी जाऊन तिला मागणी घालूया आणि तुमचा साखरपुडा करून घेऊ. मग तू खुशाल अमेरिकेत जा.”

सिलूला तर त्याच्या कानांवर विश्वास होत नव्हता. इतक्या सहजासहजी अम्मा मुग्धाला अॅक्सेप्ट करेल असे सिलूला कधीच वाटले नव्हते. त्याने अम्माला घट्ट मिठी मारली. अप्पाने ही त्याच्या डोक्यावरून हात फिरविला.

क्रमश:
आता मुग्धाचे काय रीअॅक्शन असेल जेव्हा तिला हे सर्व कळेल. त्यासाठी सिलू आणि मुग्धाच्या प्रेमाची साक्ष देणारी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद)
@preetisawantdalvi

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED