म्हातारपण - 3 - निर्णय

  • 9k
  • 3.1k

बाहेर पितळीबंब धूर ओकत होता . बऱ्याच वेळापासून पाणी उकळत असल्यामुळे अंघोळीला घेण्यायोग्य झालेच होते . म्हणून दुर्गा काकूंनी पाणी टाकले आणि आबांना आवाज देऊ लागल्या आज बबनच घर बघण्यासाठी मुलीवाले येणार असल्याने त्याची चोख व्यवस्था व्हावी यासाठी दुर्गा काकूची धावपळ सुरू होती. आबांचा मोठा मुलगा बबन पुण्यात जॉब करत होता. शिवाय पगारहीं चांगला घरी बावीस एकर बागायत शेती धाकटा मुलगा इंजिनियर च्या दुसऱ्या वर्षाला होता. बापूंच आबांसोबत फोनवर बोलणं झालं आणि मुलीकडची लोक यायला निघाली होती. फोनवर झालेल संभाषण उरकून आबा धावत अंघोळीला आले. दुर्गा काकूना गोड बातमी देऊन टाकली. तुमच्या याहीनबाई निघाल्या आहेत. आवरलं का तुमचं सगळं