प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५९.

  • 6.4k
  • 1
  • 2.4k

सकाळी..... डोअर बेल वाजते..... मावशी जाऊन दार उघडतात.... समोर शौर्य उभा असतो..... त्या त्याला आत बोलावून घेतात.... सगळे बाहेर हॉलमध्ये बसून असतात..... सुकन्या तिच्या रूम मध्ये रेडी होत असते..... आजी : "अरे शौर्य बाळा.... ये.... लवकर आलास.... बस...." शौर्य : "सुकन्या??" आजी : "हो हो... तयार होत आहे ती...." शौर्य बसतो..... शौर्य : "बाकीचे कुठे गेलेत.....??" आजी : "सल्लुचे लेक्चर्स होते..... सो, तो मॉर्निग वेळेस निघून गेला..... संजय ऑफीसच्या कामाने आणि जया किचनमध्ये आहे.... आणि हो मी इथे आहे तुझ्या समोर..." शौर्य : "यू आर सो फनी, ग्रॅणी...." आजी : "अरे चार दिवस जगतो आपण.... त्यातही मोजून मापून कशाला जगायचं....