भिकारीण

  • 12.4k
  • 3.8k

मी घाईघाईतच आज सकाळी घरातुन निघालो. समोर येणा-या प्रत्येक व्यक्तीवर चिडचिड होती. मी बांद्रा स्टेशनवर मुंबईला जाण्यासाठी ७ नं. प्लॅटफॉर्म धावत चाललो होतो, बांद्रावरुन मला ९ वाजुन ३६ मिनीटांची मुंबईला जाण्यासाठी ट्रेन होती. पण प्रोब्लेम हा होता की...काही करुन मला ती ट्रेन पकडायचीच होती. नाहीतर मला ऑफीसमध्ये इंट्री नव्हती. मी धावतोय धावतोय तोच माझा पाय एका वृद्ध स्त्रिच्या पायाला लागला आणि मला तोल न सावरता आल्यामुळे मी खाली पडलो. मी क्षणाचाही विचार नाही केला आणि मनात येतील तेवढ्या शिव्या आणि असभ्य भाषा मी त्या स्त्रिसाठी वापरत राहीलो. ती मात्र काहीच बोलली नाही माझ्याकडे शांत बघत बसलेली आणि तसंही मी तिला