मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 17

  • 9.9k
  • 1
  • 4.1k

पुढे... "सब्र की आंच पर थोडा तपने दो इसे, इश्क है या वहम, सारे पर्दे हट जायेंगे।" मी बोलली होती ना...संयम ही प्रेमाची सगळ्यात कठीण पायरी आहे, आणि तीच पार करणं होतं नाही...पण कदाचित मी आणि अतुलने केली होती, कमीतकमी आम्हाला तरी असं वाटत होतं...खूप वेळा असं वाटतं की बोलून मोकळं व्हावं, मनात दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून द्यावी, पण ते शक्य होत नाही; कारण त्यावेळी आपणच जाणत नसतो की नक्की ह्या भावना आहेत कोणत्या...आणि जोपर्यंत त्या भावनांना काय नाव द्यावं हे कळते तोपर्यंत खूप उशीर होऊन जातो, पण आता उशीर करायचा नव्हता मला.... मनाच्या गाभाऱ्यातून दिलेली साद त्या