पुढे... "ये कैसा सिलसिला है तेरे मेरे दरमियाँ फ़ासले बढते रहे पर मोहब्बत कम न हुई।" आपण खरंच प्रेमात होतो किंवा आहे हे कसं ओळखायचं?? खरं तर ते प्रेम आहे हे कळायलाचं भरपूर वेळ जातो...अनेक चढउतार पाहावे लागतात, मोहाचे क्षण गाळून पाडावे लागतात, जेंव्हा सगळ्यांमध्ये असूनही दोन जीव विरक्त होऊन, त्यांच्यातल्या अंतराला न जुमानता मनाने एक होतात, तेंव्हा समजावं हे प्रेम आहे... अर्थातच यासाठी खूप वेळ आणि संयम लागतो...आणि मी अन अतुल अश्याच प्रकारच्या प्रेमात पडलो होतो..... आयुष्यात जीवन जगण्याचे क्षण अतिशय कमी येतात आणि ते जीवन नष्ट करून टाकावे ही वेळ पाऊलोपावली येते, पण त्या मरणाच्या क्षणानांही आपल्याला जीवनात