नाव : खुशाली ढोके (खुशी) जन्म दिनांक : २१ कथा प्रकार : भयकथा कथा शीर्षक : ती एक रात्र... ____________________________________________ खूप दिवसांपासून मी वरादे स्क्वेअरच्या रस्त्याने गेलो नव्हतो. तिथल्या चाट वाल्या काकांना सुद्धा तीन महिने झाले भेटलो नाही या विचारानेच आपोआप तिकडे वळलो. थोड्याच वेळात तिथे पोहचलो. वेळ होती, रात्रीचे दहा! नेहमी गर्दी असणारं ते ठिकाण आज निर्मनुष्य वाटत होतं. दुरूनच काका नजरेस पडले. पण, नेहमी हसतमुख असणारे काका आज वेगळेच भयावह वाटत होते. जवळ जाऊन नेहमीप्रमाणे ऑर्डर केलं, "काका एक मस्तपैकी चाट, एक्स्ट्रा तिखी" त्यांनी वर न बघताच एका भांड्यात काही तरी खटपट केली आणि एक प्लेट माझ्या समोर