प्रवास एक दिव्य

  • 8.2k
  • 1
  • 2.7k

आजच्या मध्यम वर्गीय तरुण किंवा शाळेत शिकणाऱ्या पिढीला प्रवास हा फारच सुखकर झाला आहे. बहुदा हवाई प्रवास असतो किंवा रेल्वे चा असला तरी एअर conditioned च reserveation असत.स्टेशनला ola/उबेर ने जायचं. हलकी फुलकी व्हील असलेली बॅग ढकलून प्लॅटफॉर्मवर न्यायची गाडी आली की शांत पणे गाडीत चढायचं आपला नंबर शोधायचं आणि बसायच दोन मिनिटांनंतर मोबाईल काढून त्यात गुंगून जायचं मग आजूबाजूला कोण आहेत कुठे जाणार आहेत कशाला चालले आहेत ह्याचा आणि त्यांचा काहीच संबंध नसतो. थोडक्यात तुमची फक्त जागा बदलते तुम्ही एक ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोहचता पण हा काय प्रवास झाला? ना तुम्हाला गर्दीचा अनुभव येतो, ना अडचणींचा सामना, ना अज्ञात