देवकुंड : एक अनुभव

  • 18.7k
  • 6.6k

इतर लोकांसारख देवकुंडला रुळलेल्या वाटेवरून भेट देणं बहुधा आमच्या नशिबात नव्हतं.. भगवान शंकराच्यासुद्धा मनात असावं की , आम्ही त्याच्या पवित्र स्थानाला भेट देण्यासाठी परिश्रम करावेत. त्यामुळेच तीन वेळा अगदी सगळी तयारी होवून सुद्धा आमची देवकुंड ट्रीप रद्द झाली होती.. आणि एक दिवस ‘महाराष्ट्र देशा ट्रेकिंग ग्रुप’ वर देवकुंड रॅपलिंग बाबत जाहिरात आली. त्याच वेळी मनात नक्की केलं, आपण यावेळी जायचच. मग काय.. सगळी माहिती घेण सुरू केले.. जसं की,या वयात आपल्याला रॅपलिंग जमेल का ? यू ट्यूब वरती व्हिडिओ बघून, आणि ग्रुप लीडर्स बरोबर बोलून बऱ्याचशा शंकांचे निरसन करून घेतले आणि आम्ही देवकुंड रॅपलिंग आणि देवकुंड धबधबा ट्रेक करण्याचे