मला समजलेली गीता.

  • 10.5k
  • 2
  • 3.4k

जयजय रघुवीर समर्थ शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात चार वेद, अठरा पुराण, एकक्षेआठ उपनिषद, दोन इतिहास आणि असंख्य श्लोक, सुभाशित, भाष्य, सूत्र आहेत. जर कोणाला वाटलं तरी तो मनुष्य आपल्या संपूर्ण आयुष्यात एवढ सगळं वाचू शकणार नाही आणि वाचलं तरी गोंधळून जाईल, कारण श्रुति: विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना, न एको मुनिर्यस्य वच: प्रमाणम्। धर्मस्य तत्व निहित गुहायाम्, महाजनो येन गत: स पन्‍था ।। अर्थात तर्काने पदार्थाचे ज्ञान होत नाही, श्रुतींचा विरोधाभास आपापसात दिसतो, असा एकही ऋषी नाही, ज्यांचे वचन आपण पुरावा आणि धर्माचे तत्त्व म्हणून स्वीकारू शकतो. अशा अवस्थेत