अभिषेक

  • 7k
  • 2.5k

अभिषेक रेवतीबाई शाळेत जाण्याची तयारी करत होत्या . डब्यासाठी भाजी चपाती तयार केली होती.डबा भरायचा होता.कंगवा घेऊन त्या अंगणात आल्या.सकाळचे नऊ वाजले होते. थोडीफार थंडी होती.पलीकडच्या काजूच्या झाडातून प्रकाशकिरण अंगणात डोकावत होते.त्यामुळे उन्हात उभे राहिल्याने त्यांना थोड बर वाटल. वातावरण प्रसन्न व चैतन्यदायी होत. " बाईंनू तयारी झाली?"हायस्कूल मध्ये जाणारी मुल हाक मारत होती." होय .शाळेत चाललात? सावकाश चला."पंचक्रोशीतील काही मुल पाऊण एक तास चालत हायस्कूल मध्ये जात.वाडी- वाडीतली मुल घोळक्या- घोळक्याने जात.गप्पा-गोष्टी करत रमत गमत जात. काटे कुटे ..नदी नाले ओलांडत...रानटी प्राण्यांचे...पाखरांचे आवाज कानात साठवत...ज्ञानाची वाट सोपी करत जात.खर म्हणजे रेवतीबाई दोन महिन्यांपूर्वी या गावात बदली होवून आल्या होत्या..गावात चवथी