नक्षत्रांचे देणे - ११

  • 8.8k
  • 1
  • 4.9k

''सावंत लीगलच्या फाइल बद्दल काय निर्णय झाला.''  किर्लोस्करांनी विषयाला हात घातला. ''ज्या मुलीने ऐनवेळी येऊन चंदीगढमध्ये प्रेझेंटेशन दिले तिच्यासोबत ती फाईल गेली आहे. दुर्दैवाने ती मुलगी आमच्या जास्त परिचयाची नसल्याने वेळ लागला आहे. तरीही आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.’’ सावंत त्यांच्याकडे पाहत म्हणाले. ''सर, कंपनीके रेप्युटेशन का सवाल है. ती फाइल लीक झाली तर....'' मुखर्जी पुढे बोलणारच तेवढ्यात सावंत ओरडले. ''तर काय होईल हे तुम्ही आम्हाला सांगण्याची काही गरज नाही. कंपनीचा करता धरता मी आहे. मी बघतो काय करायचं ते.'' ''होय सावंत. तुम्ही सर्वेसर्वा असलात तरीही मी सुद्धा तुमचा पार्टनर आहे, हे विसरू नका. तुमच्या मुलाच्या चुकीमुळे मला देखील