नक्षत्रांचे देणे - १२

  • 8.1k
  • 1
  • 4.8k

‘ग्रहशांती अगदी व्यवस्थित पार पडली, मिस्टर आणि मिसेस सावंत सत्यनारायण पूजेला बसले. तोपर्यंत संध्याकाळ व्हायला आली होती. अजूनही भूमीची काहीही माहिती मिळाली नाही, म्हणून क्षितीजची काळजी अजून वाढत चालली होती. तो आपल्या माणसांना फोनवर फोन करून सारखी विचारपूस करत होता. आलेली बहुतेक सगळी मंडळी पूजेचा प्रसाद घेऊन घरी निघायला लागली. साठे काका प्रसाद घेऊन निघालेच होते. मिस्टर सावंत आणि मंडळी त्यांच्या पाय पडले आणि काका दरवाजाकडे वळले. गर्दी कमी झालेली पाहून, मिस्टर सावंतांनी पुन्हा क्षितिजला विचारले, ''काही माहिती मिळाली का?'' ''नाही.'' म्हणून मन डोलावत क्षितीज अस्वस्थ झाला. खरतर त्याची आशा आता पूर्णपणे मावळली होती. थोड्याचवेळात  बाहेरच्या मुख्यदारावर कोणीतरी विचारत होते,