चैन सोडवण्याचा प्रयत्न करत असलेली भूमी क्षितीजच्या अगदी जवळ आली होती. दोघांमधील होते नव्हते ते हि अंतर जवळजवळ मिटले. त्याचा भिजून चिंब झालेला ओला व्हाइट शर्ट आणि तिला अजूनच चिपकून बसलेली तिची सुती साडी, वरून बरसणाऱ्या जलधारा… दुरून पाहणाऱ्याला नक्कीच काहीतरी वेगळा संशय आला असता. हे लक्षात आल्यावर तिने चैनला जोराचा हिस्का दिला, त्यामुळे ती चैन अजूनच अडकली होती. मान तिरकी करून उभ्या असलेल्या तिला तिच्या नकळतं क्षितीज न्याहाळत होता. आज मौसम कुछ और हीं हैं। असं त्याला वाटलं. तिची मात्र वरती पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. एवढ्या जवळून त्याला पाह्ण्याच धाडस होतच कुठे म्हणा. तिच्या ओल्या झालेल्या अस्ताव्यस्त केसांच्या काही