नक्षत्रांचे देणे - २१

  • 7.3k
  • 4.4k

''संजय उद्या रिसेप्शन पार्टी आहे, निल आणि संजनाच्या लग्नाची. आपल्या फॅमिलीला खास इन्व्हेटेशन आहे.'' आज्जो गाडीमध्ये बसून आपल्या जावयाला सांगत होती. ''जोशी कुटुंब चंदिगढ वरून आले का इकडे?'' संजय (मिस्टर सावंत) ''होय, केव्हाच... क्षितीज गेला होता त्या लग्नाला म्हणून त्यांना बरं वाटलं.'' आज्जो ''ओह, मला जमेल असं वाटत नाही. तुम्ही दोघी रिसेप्शनला जाऊन या.'' संजय ''क्षितिजला सांग आमच्या सोबत यायला. तू सांगितलंस तर येईल तो.'' आज्जो ''सांगतो. मी पुढे एका कामासाठी जातोय. रात्र घरी येईन. तुम्हाला कुठे सोडू? '' संजय ''मला फिनिक्स मॉलला सोड. थोडी शॉपिंग करेन म्हणते.'' आज्जो एकदम आनंदी होत म्हणाली.