प्रेमगंध... (भाग - ३५)

  • 8.3k
  • 1
  • 4.1k

आपण मागच्या भागात पाहीलं की कुसुम राधिकाच्या बाबांना त्यांच्यासोबत येऊन राहायला सांगते... भीम्या गोविंदसोबत काम का करू लागला हे सगळं सुमीने राधिकाला सांगितलं... अजयची आई अजूनही शांतच होती कोणासोबत काहीच बोलत नव्हती. सगळे शेतात फिरत होते त्याचवेळी तिथे गोविंद येतो आणि भीम्याच्या कानाखाली वाजवतो... आता पुढे... गोविंदने भीम्याला मारायला सुरूवात केली... पण भीम्याने गोविंदवर अजिबात हात उचलला नाही... सुमीने गोविंदसमोर जाऊन हात जोडले आणि रडू लागली. कृष्णा खूप घाबरला तो रडू लागला... राधिकाने त्याला जवळ घेतलं आणि आतमध्ये घेऊन गेली... "मालक, हात जोडते तुमच्यासमोर... सोडा माझ्या नवर्‍याला..." - सुमी... "गोविंदा सोड त्याला, काय चालवलंस तू? प्रत्येकवेळी तूझी दादागिरी खपवून