नक्षत्रांचे देणे - २६

  • 7.7k
  • 4.6k

''भूमीला कळवायचं का हो?'' माई नानांना विचारत होत्या.   ''नाही, कोणतीही गोष्ट सांगण्याची काहीही गरज नाही. ती तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय. आता या मुलाचं रडगाणं ऐकवून तिला का त्रास द्यायचा?'' नाना   ''ते बरोबर आहे हो. पण विभास तिला फोन करून सांगणार आहे, त्याआधी आपण थोडी कल्पना देऊ म्हणते.'' माई   ''काय गरज आहे? तिला फसवताना त्याने काही कल्पना दिली होती का? आता ती फॉरेनर त्याला सोडून गेली, त्याला भूमी काय करणार. याच्या सुखदुःखाशी भूमीचा काडीमात्र संबंध नाही.'' नाना फार चिडले होते. त्यांनी माईना ताकीद दिली, भूमीला विभासच्या कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही कळवायचं नाही. माईंना विभास बद्दल वाईट वाटत