नक्षत्रांचे देणे - २७

  • 7.2k
  • 4.5k

''निधी तू येणार नाही म्हणालीस ना? मग अचानक कशी काय?'' भूमी ''अग इकडेच एक काम होतं. तर म्हंटल आले आहे तर तुझं ऑफिस बघून जावं. केवढं मोठं आहे ना ग.'' ती ऑफिसच्या बिल्डिंगकडे बघत म्हणाली. उगाचच काहीतरी बोलून निधीने वेळ मारून नेली होई. ''होय, मग जा ना बघून ये.'' भूमी ''तू नाही येत का?'' निधी ''नाही, मला कंटाळा आला आहे. घरी जाते.'' भूमी हातातल्या फाइल्स लपवत म्हणाली. ''मी दाखवतो ऑफिस. चालेल?'' म्हणत क्षितीज तिथे आला. ''अरे वाह, प्लिज.'' निधी ''मी निघते, कॅब येईलच एवढ्यात.'' भूमी ''कॅब का ग... कॅन्सल कर आधी. आपण