जव्हार डायरीज - पार्ट २

  • 7.1k
  • 3.3k

कार पार्क करून आम्ही समोरच असलेल्या रिसेप्शन कडे निघालो. रुपेश ने आमचे टेंपरेचर चेक करून आमची रूम उघडुन दिली.मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जव्हार सारख्या ठिकाणी खूप लक्सरी नाही मिळणार पण आमची जी रूम होती ती स्वच्छ आणि आरामदायी होती. आम्ही आमचे सामान ठेवून रिलॅक्स झालो. दुपारच्या जेवणाची वेळ अजून झाली नव्हती . त्यामुळे आम्ही या फार्म हाऊस चा एक फेरफटका मारायला बाहेर पडलो. इथे राहण्यासाठी ज्या रूम्स आहेत त्या दोन ठिकाणी आहेत. काही रूम्स रिसेप्शनच्या बाजूलाच आहेत. काही रूम्स रिसेप्शन समोरच्या एक मजली बिल्डिंग मध्ये तळ मजला आणि पहिला मजला वरती विभागलेल्या आहेत. डायनिंग हॉल उजव्या हाताला आहे.. हॉलच्या आतमध्ये