प्रेमगंध... (भाग - ३७) 

  • 10.3k
  • 4.5k

( आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय आईचं म्हणणं ऐकून राधिकाला सोडण्याचा विचार करतो... अजय आणि राधिका दोघेही एकमेकांच्या आठवणीत रडत असतात... कुसुम अजयच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करते पण ती तीच्या निर्णयावर ठाम असते... भालेकर वाड्यावर सर्व गावकरी जमा होतात... गोविंदच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सगळे गावकरी कुसुमला साथ देण्यांस तयार होतात... आता बघूया पुढे...) राधिकाने आज सकाळी शाळेत जाण्याची तयारी केली... कुसुमने स्वतःच राधिकाला जेवणाचा टिफीन आणून दिला आणि तीच्या डोक्यावर मायेने हात फिरवला.... "राधी, सगळं काही ठिक होईल... तू काही काळजी करू नकोस... मी आहे तुझ्यासोबत..." - कुसुम. "हो... आतू चल येते मी..." - राधिका. "हो बाळा काळजी