टांझानियाची शिकारी सफर

  • 7.8k
  • 3.6k

पूर्व अफ्रिकेतील टांझानिया हा ६ कोटी लोकसंख्येचा देश तेथील वन्यजीवन व हजारो वर्षांपासून टिकून असलेल्या आदिवासी प्रजातींमुळे व त्यांच्या परंपरांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. याच टांझानियाच्या अरुषा प्रदेशातील करातू जिल्ह्याच्या आग्नेय भागात 40 हजार वर्षांची परंपरा असलेली 'हद्झाबे' किंवा 'हद्झा' ही आदिवासी मूलनिवासी जमात वास्तव्यास असलेली आढळून येते. आजतागायत जवळपास 1200 इतकेच या जमातीचे लोक राहिले आहेत. आजूबाजूच्या गावांतील शहरीकरण, आधुनिक जीनशैलीमुळे बहुसंख्य लोकांनी पारंपरिक जीवनशैली सोडून आधुनिकतेची वाट धरली असावी. या बाराशे लोकांपैकी केवळ 350 ते 400 लोकच पारंपरिक पद्धतीने प्राणी, पक्षांची शिकार करून जीवन जगतात. इतर लोकांनी शेती, पाळीव प्राणी यांच्या आधारावर जीवन जगायला सुरुवात केली आहे. याचे मुख्य